नाभिक समाज दुकानदार संघटनेतर्फे धरणगाव तहसीलदार यांना व पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी :
नाशिक जिल्ह्यातील खमताने येथील बालिकेवर सत्तर वर्षीय म्हाताऱ्याने अत्याचार केल्याप्रकरणी धरणगाव नाभिक समाज दुकानदार संघटनेतर्फे धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना व पोलिस अधिकारी यांना सर्व दुकानदार बांधवांतर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे व पीडित कुटुंबास न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना समाजात घडू नयेत, यासाठी शासनाने आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीश बोरसे, उपाध्यक्ष गणेश झुंजारराव, सचिव दिगंबर निकम, नाभिक महामंडळ कार्यकारिणी सदस्य राजेंद्र अण्णा फुलपगार, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रवी निकम, तालुकाध्यक्ष महेश निकम, संजय झुंजारराव, अध्यक्ष अशोक झुंजारराव, कमलेश बोरसे, गोपाल फुलपगार, भूषण वारुळे, सुभाष बोरसे, बापूजी फुलपगार, सचिन ठाकरे, मोहन फुलपगार, महेंद्र निकम, उज्ज्वल महाले, भैया झुंजारराव, ज्येष्ठ समाजसेवक गजानन फुलपगार यांच्यासह असंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
