साईमत, पारोळा : प्रतिनिधी
येथील नॅशनल हायवेवरील धरणगाव रस्त्यालगत चौफुलीला ‘श्री संताजी महाराज सर्कल’ असे नाव देण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे, नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना तेली समाज बांधवांतर्फे नुकतेच देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, परिसरात तेली समाज बांधवांचा सर्वाधिक वापर आहे. धरणगाव रस्त्याने तेली समाज बांधवांची ८० टक्के शेतजमीन याच सभोवतालच्या परिसरात आहे. सर्कलला ‘श्री संताजी महाराज सर्कल’ नावाने मंजुरी मिळाल्यास त्या नावाने संबोधण्यात येईल. तसेच मुखाने वाचून संताजीचे नाव घेण्यात येईल. म्हणून पुढील कार्यवाही करून चौफुलीला नाव देण्याची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.
निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष कैलास चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, माजी नगरसेवक भैय्या चौधरी, माजी शिवसेना शहर प्रमुख अण्णा चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल चौधरी, संताजी महाराज जगनाडे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, मनोज चौधरी, प्रल्हाद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अमृत चौधरी, राजेंद्र चौधरी, गोकुळ चौधरी, तेली समाज पंच मंडळ, तेली समाज नवयुवक मंडळाचे पदाधिकारी, तेली समाज बांधव उपस्थित होते.