आजार टाळण्यासह आरोग्य रक्षणासाठी उपाययोजनांवर मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
धनत्रयोदशी आणि वैद्यक शास्त्राची देवता धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यातील वाकडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात धन्वंतरी पूजन आयोजित केले होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. धन्वंतरी पूजनाचे विधी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास माजी सभापती घनश्याम पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. गोपाल वाणी, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी मनिषा वाकोडे, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक व्ही.एच. माळी, आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे, आरोग्य सहाय्यक अमित तडवी, आरोग्य सेविका लता सुरळकर, वाहन चालक जावेद तडवी, परिचर फुलवंती रबडे, आशा स्वयंसेविका सुनीता काणेकर, ज्योती केदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यास पाठिंबा
धन्वंतरी पूजनानंतर डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्थित नागरिकांना आजार टाळण्यासाठी आणि आरोग्य रक्षणासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाद्वारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी आरोग्य संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यास महत्वाचा पाठिंबा दर्शविला. धन्वंतरी पूजनाच्या पारंपरिक धार्मिक विधींमध्ये आधुनिक आरोग्य माहिती समाविष्ट करून उत्सव साजरा केला.