धानोरा विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा

0
49

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर

येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजात प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय समितीचे सदस्य सागर चौधरी होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन, ज्येष्ठ शिक्षक एल.डी.पाटील, आर.बी.साळुंखे, श्रीमती उषा भील, प्रा. रेखा महाजन, पूनम पाटील, श्रीमती ई.टी. भांबरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सरस्वती प्रतिमा पूजन व माल्यार्पण सागर चौधरी, जगदीशकुमार पाटील, प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक मोहन चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे हिंदी विषयाचे शिक्षक वासुदेव महाजन यांनी हिंदी दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण व श्रीमती योगीता बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदी दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत ५ ते ७ वीच्या गटातून प्रथम, द्वितीय तथा तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ८ ते १० वीच्या गटातून प्रथम मानसी प्रदीप शिंदे, इशा धनंजय पाटील, द्वितीय सानिया पिंजारी, तृतीय बुद्धभूषण चुडामण शिरसाठ, पूर्वा विनोद गुजर या विजेत्या विद्यार्थ्यांना गुजर शैक्षणिक विकास मंचच्यावतीने शालेय साहित्य व विद्यालयाचे उपशिक्षक एस.एस.पाटील यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम

याप्रसंगी परीक्षक म्हणून संस्थेचे सेवक जगदीशकुमार पाटील, ई.टी.भामरे, एस.एस.पाटील यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी डी.एस. बडगुजर, प्रा.एस. बी बडगुजर, एस.व्ही.डी.कोष्टी, सी.आर. चौधरी, ए. पी. सिरसाठ, दिगंबर सोनवणे, अरुण पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एस.डी.सोनवणे, देविदास महाजन तर आभार दिपेश बडगुजर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here