सहा पवित्र स्थळांना देणार भेटी, बुध्दाच्या पवित्र स्थळाचे घेणार दर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील ४२ भीमसैनिकांची भगवान बुध्दाच्या पवित्र स्थळाची धम्मसहल निघाली आहे. सहलीत भीमसैनिक भगवान बुध्दाच्या सहा पवित्र स्थळांना भेटी देऊन भगवान बुध्दाचे दर्शन घेणार आहेत. भीमसैनिक शनिवारी, ९ नोव्हेंबर रोजी भुसावळ ते वाराणसी येथे रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यानंतर बसने सारनाथला भगवान बुद्धची ८० फूट मूर्ती, चौघडी स्तुप, धमेक स्तुप, मुलगंध कुटी विहार, मृगदायन, अशोक स्तंभचे दर्शन घेऊन बोधगयासाठी रवाना झाले आहेत.
११ ते १७ नोव्हेंबरपर्यंत भगवान बुद्धची पवित्र स्थळ राजगिर, नेपाळ, श्रावस्ती येथे दर्शन घेऊन लखनऊहून जळगावसाठी रवाना होणार आहे. दहा दिवसाच्या धम्मसहलीचे आयोजन श्री.पांडव सर भुसावळ यांनी केले आहे. सहलीत विनोद निकम, ज्योती निकम, संगिताताई भालेराव, रत्नमाला सालवे, उखाबाई निकम, राजेंद्र भालेराव, प्रकाश जाधव, वंदना बागर, आनंद निकम, सुमित निकम, बहिणाबाई सोनवणे, बेबाबाई वानखेडे, मनिषा मराठे, कमलाबाई वानखेडे, सुनिता निकम यांच्यासह ४२ भीमसैनिकांनी सहभाग घेतला आहे.