साईमत जळगाव प्रतिनिधी
पौर्णिमा वुमन्स फाउंडेशन जळगाव तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमत्त रेल्वे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ धम्म पहाट हा भिम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम फाऊंडेशन च्या वतीने त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री. बुध्दाच्या चरणावती….,साऱ्या विश्वाला बुध्द हवा…., पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे ..,किती भीमाच्या सांगाव्या कथा..,दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले ..अशा सुमधुर गीतांनी परिसर प्रसन्न झाला व याच सुमधुर भीम बुद्ध गीतांचा आस्वाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंदन करायला येणाऱ्या अनुयायांनी घेतला .
सदर कार्यक्रमात योगेश भालेराव ,कावेरी सूरवाडकर , राजू बेहरे सर , नर्मदा भालेराव , कबीर लांडगे ,कमल ढिवरे आदींनी आपली गीते सादर केली तर डॉ.सुषमा तायडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
गायक कलाकारांचा फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आणि सरणोत्तयाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमासाठी पौर्णिमा वुमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शालिनीताई बिऱ्हाडे, उपाध्यक्ष गौतमी वाघमारे , सचिव किरण वनकर , सहसचिव अंजली मेंढे ,कोषाध्यक्ष किरण भालेराव ,सभासद स्वाती सातपुते , किरण रंधे , शारदा भालेराव, उषा बेहेरे ,माया मोरे, सुषमा कांबळे ,प्रज्ञा तायडे आणि संपूर्ण पौर्णिमा वुमन्स फाउंडेशनच्या सभासद भगिनींचे सहकार्य लाभले.