‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’च्या जयघोषात चौदा जोडप्यांच्या हस्ते महाआरती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
‘बोल बम का नारा है, बाबा एक सहारा है’, ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’च्या जयघोषाने भक्तीमय वातावरणात सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी चौदा जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात नंदीदेवता आणि महादेवाच्या शिवलिंगाला पहाटे नीलेश जोशी आणि नरेश बागडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. तसेच रक्षाबंधन हा सण सोमवारी आल्याने महादेवा….‘भाऊ-बहिणीसह भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो’ अशी प्रार्थना आरतीचे मानकरी सुरेश पाटील-मनिषा पाटील, रमाकांत महाजन-अर्चना महाजन, माणिक चौधरी-कल्पना चौधरी, प्रकाश कुंभार-शोभा कुंभार, धनराज कुंभार-मंगला कुंभार, विकास जांगिड-कविता जांगिड, विनोद पाटील – बेबाबाई पाटील, मयूर गुरव- श्रध्दा गुरव, दिनेश जाधव-भारती जाधव, संजय वानखेडे-प्रमिला वानखेडे, नारायण येवले- माधुरी येवले, संजय बोरनारे -बेबीबाई बोरनारे, सरदार राजपूत- सुनिता राजपूत, ममता राणा, ज्योती भावसार यांच्या हस्ते नंदी देवता आणि जागृत स्वयंभू शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली.
शिवभक्तांची पहाटेपासून दर्शनासाठी रिघ
जागृत स्वयंभू महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त शिवलिंगाला बेलपत्राने सजविण्यात आले होते. पिंप्राळा परिसरात स्वयंभू महादेव मंदिर प्रसिद्ध असल्याने पहाटेपासून शिवभक्तांची रिघ सुरू होती. यावेळी विनोद निकम, नरेश बागडे, मधुकर ठाकरे, सरदार राजपूत, यशवंत पाटील, विजय चव्हाण, संजय भोई, हेमराज गोयर, मिलिंद पाटील, उमेश येवले, ओमकार जोशी, निलेश चौधरी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर, ओंकार पार्क, श्रीराम नगर, बाबुराव नगर परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.
२५ ला कावड यात्रा
शहरातील पिंप्राळ्यातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर येथून सावखेड्यातील गिरणानदी येथे श्रावणमासानिमित्त रविवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कावड यात्रा काढण्यात येणार आहे. कावड यात्रेची सांगता सोनी नगरातील महादेव मंदिरात होणार आहे. कावड यात्रेत शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.