कंजर महाराजांच्या यात्रेत उद्या राज्यभरातील भाविकांची उसळणार गर्दी

0
28

जळगाव, दोंडाईचातील भाविकांचा असणार समावेश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

धुळे तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने-कापडणे शिवारातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र कंजर महाराज यात्रेत दरवर्षी राज्यभरातील विविध भाविकांची गर्दी असते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी यात्रा आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याने यात्रेत जळगाव, दोंडाईचासह राज्यभरातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कंजर महाराज यात्रा भरते. यात्रेत दोंडाईचा येथील कंजरभाट समाज सेवा समितीचे राजन मलके, पूनम मलके, रमेश नेतले, रामलाल बाटुंगे, श्रीकांत मलके, अमर नेतले, सुरज तमायचे, करन तमायचे, गणेश ईंद्रेकर, महेंद्र नेतले यांच्यासह कंजरभाट समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here