Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»प्रभाग १५ मध्ये करोडो रुपयांच्या विकासकामांचा झंझावात असाच सुरु राहणार: आ.मंगेश चव्हाण
    चाळीसगाव

    प्रभाग १५ मध्ये करोडो रुपयांच्या विकासकामांचा झंझावात असाच सुरु राहणार: आ.मंगेश चव्हाण

    saimatBy saimatOctober 6, 2024Updated:October 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ५० लाख रुपये खर्चाच्या बगीच्याचे लोकार्पण हा तर ‘ट्रेलर’ आहे

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

    येथील प्रभाग क्रमांक १५ मधील भव्य दिव्य असे ५० लाख रुपये खर्चाच्या बगीच्याचे लोकार्पण आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभागातील विविध नवीन रस्त्यांचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी वाल्मिक नगर येथे झालेल्या कार्यक्रमात आ. मंगेश चव्हाण यांनी माझ्या काळात प्रभाग १४ व प्रभाग १५ मध्ये अनेक विकासकामे केली आहेत.त्यातील भव्य अशा बगीच्याचे लोकार्पण होत आहे.

    लवकरच पाच कोटींच्या निधीतून परिसराला शाप ठरलेल्या नाल्याचे प्रथम टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच कब्रस्तानचे ४० वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावत कंपाऊंडही केले, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात अशीच साथ आपण दिली तर तुमच्या प्रभागाचा विकास कोणीही रोखू शकणार, असे सांगितले.

    प्रास्ताविकात प्रभागातील समाजसेवक अमोल चौधरी यांनी प्रभागात सुरु असलेल्या विविध कोटी रुपयांच्या विकास कामांचा उल्लेख करत विकास कार्याची घौडदौड अशीच सुरु राहील, असे सांगितले. तसेच मनोगतात अजिज खाटीक, असलम मिर्झा यांनी आ.मंगेश चव्हाण, अमोल चौधरी यांचे विविध विकास कामांबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी परिसरातील हिंदू-मुस्लिम समाज बांधवांनी आ.मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला.

    यांची लाभली उपस्थिती

    यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, संगिता गवळी, नदीम खान, नुरोद्दीन शेख, अजगर सैय्यद, रणजित देशमुख, राकेश बोरसे, अकलाख खाटीक, बाबा पवार, अक्रम बेग मिर्झा, बिलाल काकर, अमजद पठाण, ॲड.कैलास अगोणे, सुनील पाटील, मयूर चौधरी, इम्रान पठाण, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, देविदास वाणी, दाऊद शेख यांच्यासह परिसरातील हिंदू-मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन तथा आभार वसिम शेख यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.