Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»देशमुख वाड्यातील तरूणाची पावणे तेरा लाखांत ऑनलाईन फसवणूक
    क्राईम

    देशमुख वाड्यातील तरूणाची पावणे तेरा लाखांत ऑनलाईन फसवणूक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील देशमुख वाडा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला टेलीग्राम व व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी पैसे घेवून कोणताही परतावा न देता तब्बल १२ लाख ७९ हजार ३७५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक करुन गंडविल्याची घटना मंगळवारी, १८ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे विशाल रामराव सूर्यवंशी (वय २७) हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. गेल्या १० मे २०२४ रोजी विशालला प्लेक्स मुव्हीज या टेलीग्रामवर तसेच व्हॉटस्‌ॲपवर आणि कस्टमर केंअर व्हॉटस्‌ॲप क्रमांकावरून फोन व मॅसेज करून त्याला टास्क पूर्ण करण्याचे बहाणा करून त्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर विशालकडून वेळोवेळी बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने १४ लाख ३२ हजार ४०७ रूपये घेतले. त्यातील १ लाख ५३ हजार ०३२ रूपये परतावा केला. परंतु उर्वरित रक्कम १२ लाख ७९ हजार ३७५ परत दिली नाही.

    दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे विशालच्या लक्षात आले. त्यानंतर १८ जून रोजी रात्री साडेआठ वाजता जळगाव येथील सायबर पोलिसात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026

    Jalgaon:राजमालती नगर रस्ता बंद होण्यापूर्वी पर्यायी मार्गाची मागणी

    February 24, 2026

    Shirsoli : शिरसोलीत २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.