तक्रारदार नागरिकांना मनपा प्रशासनातर्फे उपस्थितीचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शासनाच्या परिपत्रकानुसार महानगरपालिका आयुक्त स्तरावर लोकशाही दिन घेण्याबाबत आदेशीत केले आहे. त्याअनुषांने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. शासन निर्देशानुसार लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये आदेश पारीत केले आहेत. शासन परिपत्रकात स्पष्टीकरण निर्देशीत केलेले आहे. त्याअनुषंगाने १ सप्टेंबर रोजी पहिला सोमवार असून सकाळी १० वाजता लोकशाही दिन ऑफलाईन आयोजित केला आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेसंबंधी शासन निर्णयानुसार लोकशाही दिनापूर्वी ज्या नागरिकांनी १५ दिवसाआधी वैयक्तीक तक्रार अर्ज, निवेदने सादर केलेल्या अर्जदार, नागरिकांना मूळ अर्जासह मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात शासनाने दिलेल्या कोरोनासंदर्भातील निर्देषाप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे कटाक्षाने पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन मनपा प्रशासनामार्फत अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले आहे.