भडगावातील आदर्श शेतकऱ्यावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला

0
29

नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे पोलिसांचे दुर्लक्ष

साईमत/भडगाव/प्रतिनिधी :

येथील आदर्श शेतकरी तथा माजी नगरसेवक बांधकाम सभापती नथू भिवा अहिरे हे भडगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन घरी येत होते. तेव्हा भडगाव शहरातील वाळू चोर तसेच वाळू माफियांकडून त्यांना त्यांच्या घराच्या रस्त्यावर असलेले शिवनेरी गेट येथे २५ ते ३० जणांनी अडविले. त्यांच्यावर धक्काबुक्की करत प्राणघातक हल्ला केला. तसेच मारून टाकण्याची धमकी देत त्यांच्यावर हल्ला केला आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाचे भडगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.

काही दिवसांपूर्वी जुना पिंपळगाव रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाळू चोर वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी भडगावचे तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना वाळू माफियांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. परंतु महसूल विभागातर्फे व पोलीस प्रशासन मार्फत वाळू माफियांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्या निवेदनाचा वचपा काढण्यासाठी वाळू माफियांंनी शेतकरी नथू अहिरे, पुतण्या मंगेश अहिरे, भाऊ अशोक अहिरे, मुलगा निलेश अहिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यांना मारहाणीत मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली.

त्यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन वाळू माफिया पंकज दीपक मोरे, प्रदीप कैलास बोरसे, संदीप अक्षय वाघ, भिकन पंढरीनाथ बडगुजर, चेतन बाविस्कर, भुऱ्या मोहन परदेशी, उमेश बाविस्कर, गोरख रामलाल पाटील, सचिन किसन सोनवणे, दीपक उत्तम मोरे, चतुर पाटील, राहुल ठाकरे, आबा महाजन उर्फ भेंड आबा यांच्यासह २५ ते ३० जणांनी परिवारावर प्राणघातक हल्ला करीत जीवे मारत ठार करण्याची धमकी दिली होती.

परिवारावर खासगी हॉस्पिटलला उपचार सुरू

सध्या परिवारावर मोठ्या प्रमाणात प्राणघातक हल्ला झाल्याने परिवारावर भडगाव शहरातील समर्पण हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. सध्या हा परिवार भीतीच्या वातावरणात वावरत आहे. सध्या भडगाव शहरात तसेच तालुक्यात ‘कुंपणच शेत खात’ असल्याने वाळू माफियांवर कारवाई होणे अशक्यच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here