Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»तोंडापूर-भारुडखेडा रोडवर आढळला मृत बिबट्या
    जामनेर

    तोंडापूर-भारुडखेडा रोडवर आढळला मृत बिबट्या

    SaimatBy SaimatDecember 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Oplus_131072
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तोंडापूर-भारुडखेडा रोडवर आढळला मृत बिबट्या

    जामनेर – प्रतिनिधी

    तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारातील भारुडखेडा-तोंडापूर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे यांच्या गट नंबर ८२ मध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वनक्षेत्रपाल जामनेर, वनपाल, वनरक्षक गोद्री, वनरक्षक पठाड तांडा आणि वनरक्षक पिंपळगाव यांना परिसरातील नागरिकांकडून मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी सखोल चौकशी केली असता वनक्षेत्रापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळून आले. मृत बिबट्या वनपरिक्षेत्र कार्यालय, जामनेर येथे आणण्यात आले.

    पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे आणि इतर दोन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मृत बिबट्या साधारण ३ वर्षाचे मादी जातीचे असल्याचे त्यांनी सांगीतले. मृत बिबटच्या शरीरावर सर्व अवयव साबूत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचा मृत्यू विद्युत तारेचा शॉक लागून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत बिबट्याच्या शरीराचे विविध अवयव न्यायवैद्यक तपासणीसाठी सीलबंद करून पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मृत बिबट्या मादीस सहायक वनसंरक्षक जळगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी जामनेर, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वनपाल गोद्री, वनपाल जामनेर, वनपाल फत्तेपूर, आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात अग्निडाग देण्यात आला.

    याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वन विभाग, जळगाव करीत आहेत. परिसरात कोणत्याही वन्यप्राण्याचा वावर आढळल्यास त्वरित जवळच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026

    Jamner:जामनेर तलाठ्याचा रंगेहात लाचगिरीचा फटका–४ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

    January 7, 2026

    Jamner:डंपरच्या धडकेत तरुण ठार;

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.