यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
साईमत/भडगाव /प्रतिनिधी :
तालुक्यातील वाक येथे दरवर्षीच्या प्रमाणे यावर्षीही शनिवार १३ डिसेंबर रोजी दत्तप्रभू यात्रोत्सव भरणार आहे. यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी मंगल स्नान, सायंकाळी ५ वाजता आरती आणि पालखीचे सोहळा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
विशेष म्हणजे यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे लोकनाट्य-तमाशेही आयोजित केले जातात. यावर्षी दुपारी ४ वाजता तमाशाचा कार्यक्रम तर संध्याकाळी ७ ते ८ वाजता लोकनाट्य-तमाशाचे कार्यक्रम रंगणार आहेत.
यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे पाळणे, संसार उपयोगी वस्तू, कटलरी आणि मिठाईच्या दुकाने देखील भरलेली असतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दुपारी २ वाजेपासून रात्रभर ही यात्रा अविरतपणे चालते.या यात्रोत्सवासाठी परिसरातील अनेक गावांचे भाविक आणि नागरिक सहभागी होतात. वाक येथील ग्रामस्थ आणि आयोजक मंडळाने सर्व भाविकांना दर्शन घेऊन याञोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
