सोनी नगर परिसरात पथदिव्यांअभावी पसरला अंधार

0
7

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

पिंप्राळा शिवारातील गट नंबर २७७/२ मधील सोनीनगरात एका ठिकाणी चार विद्युत खांबावर पथदिवे नसल्याने काहींनी स्वखर्चाने पथदिवे लावले तर काही ठिकाणी पथदिवेच नाही. याबाबत मनपाचे एलईडी विद्युत विभागाचे कर्मचारी सोनी नगरात आल्यावर जाब विचारताच त्यांनी सांगितले की, त्याला पाचवी फेजतार लागत असल्याने जर नागरिकांनी पैसा जमा करून फेजतार आणल्यास तो लावण्याचा सल्ला दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांकडून मनपा विविध सुविधांसाठी कर आकारते. मात्र, सुविधाच मिळत नसल्याने याबाबत कैफियत कुणाकडे मांडावी पथदिवे नसल्याने परिसरात अंधार असतो. रात्री बे रात्री सर्प निघतात. तसेच भुरटे चोर अंधाऱ्याचा फायदा घेत असतात. मनपाकडे वारंवार सांगुनही दुर्लक्ष केले जात आहे.

सोनी नगरात मनपाचे एलईडी पथदिवे दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी आल्यावर नागरिकांनी जाब विचारला की, सोनी नगरातील नवीन विद्युत खांबावर पथदिवे कधी लागणार. तेव्हा त्यांनी सांगितले की, चार विद्युत खांबावर एक फेजतार लागणार आहे. त्यासाठी मनपाची फार मोठी प्रोसेस करावी लागते. जर तुम्हाला त्वरित करावयाची असेल तर स्वखर्चाने फेजतार घेवून या, लावून देवू, असा सल्ला त्या कर्मचाऱ्याने दिला आहेे.

पथदिवे सुरु करण्याची मागणी

नागरिक कर भरत असतांना सुविधा मिळत नाही आणि त्यात पुन्हा फेजतारचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. पिंप्राळापासून ते सावखेडा रोड सोनी नगरकडे जातांना चार विद्युत खांब आहे. पण पथदिवे नसल्याने महिलांना रात्री जीव धोक्यात घेवून पायी घरी जावे लागते. या ठिकाणचेही पथदिवे सुरु करण्यात यावे, अशी मागणी सोनी नगरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here