डामरूणला दोघा भावांसह एकाच्या घरात, बोरखेडा खु.ला चोरी

0
58

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

घरचे गावाला गेले असताना व दोघे भाऊ वडिलांच्या घरी जेवणाला गेल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी एका घरी व दोघा भावांच्या घराचे कुलूप तोडून घरातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रोख असा ७० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी, १७ रोजी सकाळी १०-१५ ते ११-३० वाजेदरम्यान तालुक्यातील डामरूण व बोरखेडा खु. येथील गुलाब महादु पाटील यांच्या घरी चोरीची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, योगेश पांडुरंग पाटील (वय ४२, रा. डामरुण, ता. चाळीसगाव) यांच्या घरचे गावाला गेले होते, ते आणि त्यांचे भाऊ महेश व मुलगा दुर्गेश हे १७ रोजी गावातच त्यांच्या वडिलांच्या घरी सकाळी १०-१५ वाजता जेवणासाठी गेले होते. ११-३० वाजता त्यांचा भाऊ घरी गेल्यावर दोघांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले, तेव्हा योगेश पाटील यांनी घरी आल्यावर पाहिले असता त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातून ३५ हजार रोख आणि त्यांचा भाऊ महेश यांच्या घरातील १० हजार रुपये रोख व २५ हजार रुपयांचे सोन्याचे लहान बाळाचे अंगठी, पदक, कानातील बाळ्या, ओम पान, चांदीची चैन असे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिसले. तसेच शेजारी राहणारे महेंद्र ज्ञानेश्‍वर पाटील यांच्या घरात तसेच बोरखेडा खु. येथील राहणारे गुलाब महादु पाटील यांच्याकडे चोरी झाली असल्याचे समजले. याप्रकरणी योगेश पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here