अपघातात वाहनाचे नुकसान

0
35

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

शहरातील खोटे नगरजवळील हॉटेल गिरणा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाणाऱ्या वाहनाचा वेग कमी झाला म्हणून ब्रेक दाबला आणि मागील वाहन येऊन मधल्या वाहनावर धडकल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी मागून धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, पारोळा येथील कापड व्यावसायिक निखील जगदीश पाटील (वय २७) हे शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या वाहनाने (क्र. एमएच १९, ईए ३२८७) जळगाव येथून पारोळ्याकडे जात होते. महामार्गावर खोटे नगर थांब्याच्या पुढे एका हॉटेलसमोर पुढे जाणाऱ्या वाहनाचा वेग कमी झाल्याने पाटील यांनीही त्यांच्या वाहनाचा वेग कमी केला. मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने (क्र. एमएच १९, बीडब्ल्यू ९७८६) धडक दिली. त्यात पाटील यांच्या वाहनाच्या डिक्कीचे नुकसान झाले. तसेच मागून धडक बसल्याने हे वाहन पुढील वाहनावरही धडकल्याने बोनट व हेडलाईटचे नुकसान झाले. याप्रकरणी निखील पाटील यांनी शनिवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या वाहनाचा चालक आपसिंह मांगीलाल धुडवे (रा. नगलवाडी बुजुर्ग, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here