कुऱ्हा-काकोडा परिसरात पुराचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान

0
25

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी

तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरातील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोदवड व मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.

तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरातील शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तालुक्यातील बोदवड, मोरझीरा, धामणगाव, मधापुरी येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. बोदवड येथे रस्त्यावरील नाल्याचे पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजूच्या शेतात शिरल्याने शेतजमीन खरडून गेली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोरझिरा येथे तलाव तुडुंब भरला असून तलावाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग होऊन शेतात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
धामणगाव येथेही नाल्याच्या- पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे. तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील तसेच तहसीलदार श्री. माकोडे, वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, नुकसान ग्रस्त भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, वन विभागाचे कर्मचारी यांचे समवेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे व उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले.

दरम्यान , आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तात्काळ नुकसानग्रस्त शेतकरी यांना नुकसान भरपाई व यासंबंधित उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, शिवाजी पाटील, पंकज पांडव, सतीश नागरे, आत्मा समिती अध्यक्ष महेंद्र मोंढाळे, सूर्यकांत पाटील,विनोद पाटील,जावेद खान आदी. शिवसेना पदाधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here