Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चोरीच्या संशयावरून दलित तरुणांना झाडावर टांगले ः प्रकाश आंबेडकरांचा दावा
    क्राईम

    चोरीच्या संशयावरून दलित तरुणांना झाडावर टांगले ः प्रकाश आंबेडकरांचा दावा

    saimatBy saimatAugust 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ः प्रतिनिधी

    मुस्लीम समाजातील विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांकडून थप्पड मारणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्रातूनही एक गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे.

    कबुतर आणि शेळी चोरल्याच्या संशयावरून तीन दलित तरुणांना बेदम मारहाण केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत असून तो हात जोडून विनंती करताना दिसतोय. आपण निर्दोष असल्याचे वारंवार सांगूनही त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही.तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्या मुलाला झाडाला टांगलेले दिसत आहे.

    “महाराष्ट्रात आणखी एक जातीय अत्याचार. हा व्हिडीओ श्रीरामपूर, अहमदनगर येथील आहे, ज्यात एक दलित तरुण हात जोडून आपण निर्दोष असल्याचे सांगत आहे. कबूतर चोरीच्या संशयावरून ३ दलित मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आणि प्रत्येकाला ४ जणांच्या टोळीने उलटे टांगले. ही घटना जातीय अत्याचार आहे आणि जातिव्यवस्थेमुळेच दलित पोरांना एवढी क्रूर वागणूक दिली आहे. चोरीच्या संशयावरून इतर कुणालाही अशीच मारहाण झाली असती का? नाही!”, असे ट्वीट प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.