शानभाग विद्यालयात गणपती उत्सवनिमित्त गीत गायनासह डाळी निवडणे स्पर्धा

0
23

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभागमध्ये गणेशोत्सवानिमित्त १९ ते २७ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यातीलच प्रथम दिवशी २० सप्टेंबर रोजी विद्यालयात गणपतीवरील गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ५वी ते ७ वीमधून १५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक अशी सरस आणि सुश्राव्य गाणी गायली. त्यात ‘देवा श्रीगणेशा’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’, ‘वक्रतुंडाय एकदंताय गौरीतनया धीमही’ अशा गीतांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेत सादर केलेल्या सर्व गीतांना विद्यालयातील शिक्षकांनी साथसंगत दिली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांमध्ये ५ वीतील भार्गवी पाटील प्रथम, द्वितीय ज्ञानेश्वरी महाजन, ६ वीतील अक्षरा कंखरे प्रथम, द्वितीय आराध्य खैरनार, उत्तेजनार्थ केदार जगताप, ७ वीतील प्राप्ती लाठी प्रथम, द्वितीय वेदांत जोशी यांचा समावेश आहे. गणपती स्तुती गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सचिन संतोष खोरखेडे (माजी विद्यार्थी काशीनाथ पलोड स्कूल) आणि विद्यालयाचे संगीत शिक्षक वरुण नेवे होते. यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख रंजना बाभुळके, कविता कुरकुरे, रवींद्र सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुपार सत्रात ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी डाळी निवडणे स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ‘पार्वतीच्या बाळा पायात वाळा…’ हे गीत उत्साहात सादर केले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांमध्ये प्रथम मीत अजय पाटील, द्वितीय रिद्धी जितेंद्र बारी, तृतीय वरद नितीन जावळे, उत्तेजनार्थ चेतना गणेश बच्छाव यांचा समावेश आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह वैचारिक भेट देवून गौरव

स्पर्धांसाठी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रासह वैचारिक भेट देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिता शर्मा, धनश्री जोशी यांनी काम पाहिले. प्रास्ताविक नंदिनी टाकणे, सूत्रसंचालन मयूर पाटील याने केले. यशस्वीतेसाठी प्रशांत महाजन यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here