मेष –
चंद्राचा सातवा गोचर व्यावसायात भरभराटी आणू शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळेल. श्री सूक्ताचा पाठ करावा. तीळ दान करावी. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.
शुभ रंग : पिवळा.
वृषभ –
आजचा दिवस संघर्षमय राहिल. व्यवसायात नवा बदल करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात. बुध आणि चंद्राची युती नोकरीत बदल करण्याचे संकेत देतो. प्रेम यशस्वी होईल.
शुभ रंग : आकाशी.
मिथुन –
बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी शुभ संकेत आहेत. सूर्य- बुधाची युती नोकरी विशेष लाभ मिळवून देईल. नवा बिझनेस सुरू करू शकतात. तीळ दान करावी.
शुभ रंग : हिरवा.
कर्क –
राशीचा स्वामी चंद्र आर्थिक भरभराटीसाठी पाठबळ देईल. दशम स्थानात गुरू असल्याने विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळेल. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी शुभ काळ. रखडलेली कामे पूर्ण होतील.
शुभ रंग : लाल.
सिंह –
चंद्राचा तृतिय गोचर कुटुंबात शुभकार्य घडवून आणेल. तगड्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळेल. सुंदरकांडचा पाठ करावा. राजकारणात यश मिळेल. गूळ दान करावा. वडिलांचा दररोज आशीर्वाद घ्यावा. दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल.
शुभ रंग : केशरी.
कन्या –
चंद्र या राशीच्या द्वितीय स्थानात आहे. आर्थिक लाभ मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. श्री विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. चार परिक्रमा करून तीळ दान करावी.
शुभ रंग : आकाशी.
तूळ –
चंद्र गोचर विशेष लाभ देऊन जाईल. नोकरी-व्यवसायात प्रगती साधाल. आरोग्य सुधारेल. हनुमानबहुकचा पाठ करावा. नोकरच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जुने मित्र भेटीचे योग आहेत.
शुभ रंग : पिवळा.
वृश्चिक –
व्यवसाय सुसाट चालेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात.
शुभ रंग : लाल आणि पिवळा.
धनु –
सूर्याचा शुभ प्रभाव जाणवेल. शुक्र आणि शनिची युती मंगलमय राहिल. ही युती कुटुंबात शुभ समाचार देऊन जाईल. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. धार्मिक यात्रेचे योग आहेत.
शुभ रंग : आकाशी आणि पांढरा.
मकर –
शनि आणि बुधाची युती नोकरीत प्रगती करेल. प्रमोशनचे योग आहेत. राशी स्वामी शनि, कुंभ राशीत आहे. कुटुंबीयासोबत धार्मिक यात्रा करू शकतात.
शुभ रंग : जांभळा.
कुंभ –
राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम दिवस. एखाद्या नवीन कार्याला सुरूवात करू शकतात. श्री सूक्तचा पाठ करावा. गायीला ताजा पालक खाऊ घाला. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
शुभ रिंग : लाल आणि केशरी.
मीन –
अष्टममध्ये चंद्र शुभ आहे. सूर्य आणि मेष युतीचा व्यवसायावर अनुकूल परिणाम जाणवेल. मोठे यश मिळेल. जोडीदारासोबत जुळवून घ्यावे लागेल. श्री विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करून फळे दान करा. गुरूचा आशीर्वाद घ्या.
शुभ रंग : लाल आणि पिवळा.