साईमत, जळगाव : प्रतिनिधी
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, जळगाव येथे अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे सायबर सुरक्षा, पोक्सो कायदा व महिलासंबंधी कायदे विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती सी. एस. पाटील होत्या. ‘सायबर सुरक्षा’ विषयावर पायस सावळे हिने मार्गदर्शन केले तर ‘पोक्सो कायदा व महिला संबंधी कायदे’ विषयावर बाल सहायता कक्ष, जळगाव येथील विद्या सोनार यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपप्रचार्य सौ.एस. एस. नेमाडे, शालेय समन्वयक राहुल वराडे, अंतर्गत तक्रार निवारण समितीचे प्रमुख प्रा.अनिता ओहळ, प्रा.एच.एम. होले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन नतीक्षा आंबेकर यांनी केले.