संस्थेअंतर्गत संजय चौधरी ठरले ‘आदर्श शिक्षक’
साईमत/यावल/प्रतिनिधी :
येथील बालसंस्कार विद्या मंदिरात शिक्षक दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच संस्थेअंतर्गत आदर्श शिक्षक म्हणून शिक्षक संजय नारायण चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रुमाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार केला.
वकृत्व स्पर्धेत प्रथम गट एक ते चार यात प्रथम क्रमांक रिद्धी पंकज गडे इयत्ता पहिली, द्वितीय गट पाच ते सात प्रथम सानवी पंकज गडे इयत्ता सहावी, द्वितीय स्वराली सुरेश तायडे इयत्ता पाचवी, तृतीय निकिता उमाकांत भोगे इयत्ता सातवी, उत्तेजनार्थ पूर्व देवेंद्र बाविस्कर इयत्ता पाचवी यांनी यश मिळविले. त्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत आपापल्या वर्गात अध्यापन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.