साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील मार्च १९८७ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक साहित्य झांज भेट देण्यात आली. यावेळी पोतदार जिनियस स्कूलचे संचालक पंढरी पाटील, हरिष ट्रेडर्सचे दिनकर माळी, माजी सैनिक किशोर पाटील, मुख्याध्यापिका नरवाडे आदी उपस्थित होते. शाळेत सांस्कृतिक साहित्य खराब झाले होतेे. बाकी साहित्य आम्ही मिळविले. तुमच्या बॅचकडून आम्हास ५० झांज द्यावे, ही माहिती आमच्या गु्रपवर टाकली. त्यानंतर लागलीच ऑनलाईन पैसा जमा केला. गणपती स्थापनेच्या दोन दिवसाआधी ६५ झांज विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे शाळेला सुंदर रॅली साजरी करता आली. त्यामुळे शाळेकडून प्रातिनिधिक स्वरूपात तिघांचा सत्कार करण्यात आला.