प.वि.पाटील विद्यालयात पाककृती स्पर्धा उत्साहात

0
34

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे शालेय पोषण पंधरवडा निमित्त तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने तृणधान्यांपासून नाविन्यपूर्ण अशा पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पालकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण पाककृतींचे सादरीकरण केले .
सदर स्पर्धेत गव्हाची खीर , भगरीची इडली , गव्हाचा पुलाव ,बाजरीचे आप्पे, ज्वारीची चकली , नाचणी चा चॉकलेट केक ,उकडीचे मोदक आदी पदार्थ पालकांनी खूप उत्कृष्टरित्या या ठिकाणी बनवून सादर केले.
त्यात सविता पाटील (ज्वारीची चकली ,केक प्रथम क्रमांक) , युगा सोनार (नाचणीचे लाडू द्वितीय) , शीतल पोतदार ( डिस्को भाकरी तृतीय ) , वैशाली बागुल (ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी उत्तेजनार्थ ,सुनीता वारके (कळण्याची भाकरी ,अंबाडी भाजी – उत्तेजनार्थ यांनी क्रमांक मिळवला .
विजयी स्पर्धकांना स्पर्धेचे प्रमुख पाहुणे विजय पवार साहेब (अधीक्षक शालेय पोषण आहार योजना)तसेच केंद्रप्रमुख गंगाराम फेगडे यांचे हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेचे मूल्यांकन व परीक्षण महाराष्ट्र शेफ तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैला चौधरी यांनी केले तर आयोजन व नियोजन उपशिक्षक कल्पना तायडे , योगेश भालेराव ,स्वाती पाटील , मंगल गोठवाल, कायनात सैय्यद यांनी केले प्रसंगी शाळेच्या मुख्या.धनश्री फालक , प्रणिता झांबरे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here