साईमत नंदुरबार प्रतिनिधी
नंदूरबार : पंतप्रधान किसान संपदा योजनेचा १० कोटींचा निधी कन्या सुप्रिया गावित यांचा फार्मकडे वळवला असून रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटी रुपयांची सबसिडी मिळाली आहे. यामुळे आता मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणीत वाढ होणार असून भाजपमध्ये पण परिवार वाद असली असल्याचं चित्र आता समोर येत आहे.
भाजप नेहमी काँग्रेसच्या परिवार वादावरून टीका करत असते. मात्र भाजपमध्ये सुद्धा परिवार वाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या दोन कन्या असून डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार, तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आहेत. या परिवार वादावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने एपीसी योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आहे.
या प्रकल्पा अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. परंतु यामध्ये चक्क राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. सुप्रिया गावित यांची तापी औद्योगिक विकास कंपनीला देखील लाभ मिळाला आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील तुषार रंधे यांच्या मधुर फूड पार्क या संस्थेच्या २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या फूड प्रोसेसिंग उद्योगाला दहा कोटीचे अनुदान सरकारने मंजूर केले आहे. तुषार रंधे हे विजयकुमार गावित यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्ष यावर टीका करत आहेत.