साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील गेल्या तीन चार दिवसांपासून परतीच्या पावसाची जोरदार बरसात सुरू आहे. यामुळे नदी, नाले, तलाव धरण, भरले असून, काढणीस आलेले सोयाबीन व काढून टाकलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने शेती शिवारात सर्वत्र पाणी साचून राहिल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले असून काढणीला आलेले सोयाबीन, उडीद पीक पाण्यात गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या काढून टाकलेले सोयाबीन भिजले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याची गरज आहे. सततच्या पावसाने पाणी लागून सोयाबीन पिवळे पडून नुकसान झाले आहे. पूर्वी झालेल्या पंचनाम्याची मदत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे.