रघुनाथराव गरूड यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील पाळधी येथील धी. शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात स्व.आचार्य गजाननराव रघुनाथराव गरूड यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज नेवे यांच्याहस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक एस.एन. पाटील, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा सुरू करण्यापूर्वी उपस्थितांनी स्व. आचार्य स्व.आचार्य गजाननराव करूड यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण व्यक्त केली.मुख्याध्यापक एस.एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना क्रिकेटसारख्या खेळांमुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारते तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, संयम आणि धैर्य यासारख्या मूल्यांची जोपासना होते, असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते मनोज नेवे यांनी विद्यार्थ्यांना खेळांमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आणि सतत प्रयत्न करणे, नियम पाळणे आणि टीमवर्कचे महत्त्व लक्षात ठेवण्याचे मार्गदर्शन केले.
शाळेच्या शिक्षकवृंदाने स्पर्धेचे सुयोग्य नियोजन केले. स्पर्धेत शाळेतील विविध वर्गांमधील विद्यार्थी सहभाग घेताना उत्साहात दिसून आले. यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी उत्साह निर्माण झाला.
स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, सहकार्य आणि सकारात्मक स्पर्धा भावनेचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि विजेत्या संघांचे सन्मान करण्यात आले.
