चाळीसगावला बालगोपाळांनी फोडली दहीहंडी

0
27

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयातील बालगोपाळांनी गोविंदा आला रे…म्हणत दहीहंडी फोडत गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला. यावेळी तीन थर लावून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडल्याने गोविंदांनी एकच जल्लोष केला.

बालवयापासूनच मुलांना भारतीय सण – उत्सवांची परंपरा माहित व्हावी. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा. यासाठी बालकमंदिर, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी करुन घेण्यात आले. काही मुले गोविंदा तर काही श्रीकृष्णाच्या आणि मुली गोपिका, राधेची वेषभूषा करुन आले होते. वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकत, अंगावर पावसाचे थेंब झेलत त्यांनी जन्माष्टमीच्या पर्वणीत आनंद लुटला. यावेळी मुख्याध्यापिका मंजूषा नानकर यांनी जन्माष्टमीची माहिती तर शिक्षक जिजाबराव वाघ उत्सवाची परंपरा सांगितली.

यांनी केले कौतुक

उपक्रमाचे संस्थेचे पदाधिकारी नारायणदास अग्रवाल, रामकृष्ण पाटील, मिलिंद देशमुख, डॉ. विनोद कोतकर, योगेश अग्रवाल, सुरेश स्वार, ॲड. प्रदीप अहिरराव, भोजराज पुन्शी, अशोक बागड, नीलेश छोरिया आदी पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी त्रिशला निकम, राजश्री शेलार, अनिल महाजन, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, सचिन चव्हाण, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दीपाली चौधरी, ज्योती कुमावत, कविता साळुंखे, रेखा चौधरी, रंजना चौधरी, सचिन पाखले, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here