जळगाव तालुका पोलिसात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील कानळदा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करत महिलेसह तिच्या पतीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे वैशाली ईश्वर सपकाळे (वय ४०) ह्या आपले पती ईश्वर सपकाळे यांच्यासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारा संदीप एकनाथ कोळी, छाया संदीप कोळी, गोकुळ एकनाथ कोळी आणि सुषमा भैय्या कोळी (सर्व रा. कानळदा) यांनी वैशाली सपकाळे यांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली.
याप्रकरणी वैशाली सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे संदीप कोळी, छाया कोळी, गोकुळ कोळी, सुषमा कोळी अशा चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ.रामकृष्ण इंगळे करीत आहे.
