हिंदुस्थान लिव्हर, इमामी कंपन्यांच्या उत्पादनांचे बनावटीकरण

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

इमामी, हिंदुस्थान युनीलिव्हर व इतर कंपन्यांच्या उत्पादनांचे नाव वापरून हुबेहूब नकलीकरण करून तसेच उत्पादन तयार करणाऱ्या जळगावातील दोन भामट्यांना मुंबईतील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी ताब्यात घेत आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

सिध्देश सुभाष शिर्के (वय-३१ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) हे नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रायव्हेट लिमीटेड, शाखा गोरेगाव इस्ट, मुंबई येथे फिल्ड ऑफिसर म्हणून कर्तव्यास आहे. त्यांना इमामी लिमिटेड, हेलिओन युके लिमिटेड, हिंदुस्थान युनिलिव्हर, रेकीट बेनेकीसर, साबळे-वाघिरे कंपनी या कंपन्यांनी त्यांच्या कंपनीत तयार होणा-या उत्पादनासारखे बनावटीकरण करून विकणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबतचे अधिकार दिले आहे. सिध्देश सुभाष शिर्के व त्यांच्या टिमला माहीती मिळाली कि, जळगाव जिल्हयात शिरसोली नाका परिसरात मोहाडी रोड, नेहरू नगर येथे राहणारा जयप्रकाश नारायणदास दारा व गायत्री नगर येथे राहणारा आकाश राजकुमार बालानी हे वरील नमुद कंपनीच्या मूळ उत्पादनासारखे दुसरे उत्पादन बनावटीकरण करीत विक्री करीत आहेत.

माहीती मिळाल्याने सदर इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली. एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कायदेशीर मदत व कारवाई करण्याबाबत सांगितले. पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांनी पथक तयार करुन सोबत नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रा लि कंपनीचे सहकारी यांना सोबत घेवुन जयप्रकाश नारायणदास दारा व आकाश राजकुमार बालानी यांना ताब्यात घेतले. त्यांचे चारचाकी वाहनांची झडती घेतली असता जयप्रकाश दारा यांचेकडे असलेल्या ३ लाख रुपये किंमतीच्या टाटा इन्ट्रा कंपनीच्या मालवाहू गाडीमध्ये३ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा माल सापडला. त्यात ईनो सिक्सर, झंडु बामच्या बाटल्या, आयोडेक्सच्या बाटल्या, हार्पिक पॉवर प्लसच्या बाटल्या, डेटॉल साबण, डव शाम्पूचे पाऊच, सर्फ एक्सलचे पाऊच नकली बनावटीकरण केलेले साहीत्य मिळून आले.

आकाश बालानी यांच्याकडे असलेल्या चारचाकी ओमनी या वाहनात १४ हजार ७४५ रुपये किंमतीची वरीलप्रमाणे नकली बनावटीकरण केलेले साहीत्य मिळुन आले. जयप्रकाश दारा व आकाश बालानी यांचेकडुन एकुण ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. फिर्यादी सिध्देश सुभाष शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही संशयित आरोपी यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेका रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचीन मुंढे, पोना. योगेश बारी, सचीन पाटील, पोका, विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, मपोका. राजश्री बावीस्कर अशांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउनी दिपक जगदाळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here