जामनेरचे जे.बी.चौधरी यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान
साईमत।जामनेर।प्रतिनिधी।
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाक्त पद्धतीने २४ सप्टेंबर १६७४ व सत्यशोधक समाजाचा वर्धापनदिन स्थापन २४ सप्टेंबर १८७३ असे दोन्ही दिवसाचे औचित्य साधून टाकळी येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम महापुरुषाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित महिलांनी महापुरुषांच्या प्रतिमा पूजन केले. नंतर सत्यशोधक समाजाच्या प्रार्थना म्हणून सुरवात करण्यात आली. उपस्थितांना जे.बी.चौधरी जामनेर यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले.
कार्यक्रमाला सरपंच समाधान वराडे, सारंगधर अहिरे, एम.डी.अहिरे, ग्रा.पं.सदस्य शालिग्राम अहिरे, ज्येष्ठ समाजसेवक पवन माळी, निवृत्ती तायडे, गोविंदा माळी, आनंद अहिरे, गोविंदा अहिरे, अर्जुन चवरे, लक्ष्मण तायडे, सुभाष जगताप, भगवान माळी, बापू महाले, राजू जगताप, गजानन अहिरे डॉ.वीरेंद्र अहिरे, सुनील सातव, कृष्णा सातव, अशोक जगन माळी, विश्वनाथ रोकडे, एकनाथ साबळे, गोरख नरवाडे, बाळू तायडे, रवी अहिरे, सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, ज्योती वराडे, आरती चवरे, प्रतिभा वराडे, सुनिता चवरे, मंगला चवरे, मनिष वराडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.