साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
शहरातील भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अनिल गंगतीरे यांनी बोदवड तहसिलदार यांच्याकडे दिनांक १३ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे निवेदन देण्यात आले आहे,तालुक्यात एकूण ५१ खेडे असून या सर्व लोकसंख्येचा ताण ग्रामीण रुग्णालयावर येत असून व ग्रामीण रुग्णालयातील मर्यादित सुविधामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या विषयी गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेता हि मागणी करण्यात आली आहे.
भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे , संघटक परेश शेळके, सदस्य रवींद्र पाटील, सागर कुकडे,गणेश लोणारे उपस्थित होते.