साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील मालेगाव रस्त्यावरील हॉटेल आशिषजवळ नगरपालिकेची मुख्य जलवाहिनीवरील पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसापासून लिक झाली आहे. याबद्दल परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेत सूचना देऊनही लिकेज असलेल्या पाईपलाईनचे काम न केल्यामुळे येथे पाईपमधून पाणी लिकेज होत आहे. ते एका खड्ड्यात जमा होत आहे. पुढे पाणी पुरवठा होत असतांना नागरिकांना हेच दूषित पाणी मिळत आहे. नळाला आलेले पाणी पूर्ण हिरवे आहे. नगरपालिकेमध्ये वारंवार तक्रारी करूनही पंधरा दिवसापासून पाईपलाईन फुटलेली आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सोडलेले पाणीच हिरवेगार रंगाचे येत आहे. या परिसरात डेंग्यूसारखे डास तयार होत आहे. त्यामुळे रोगराईस निमंत्रण देणारे लिकेज पाईपलाईनचे काम त्वरित करावे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. तक्रारीबद्दल सोशल मीडियावरील अव्वल नंबर एक व्हाट्सॲप ग्रुप ‘रहा अपडेट’वर पोस्ट नागरिकांनी व्हायरल केली आहे. नगरपालिकाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.