वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयी मोहीम
साईमत/जामनेर /प्रतिनिधी :
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत उपकेंद्र तळेगाव येथे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सर्वेक्षणाचे काम व स्वच्छतेविषयी मोहीम सुरू आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये डेंग्यू डासाबाबत जनजागृती केली जात आहे.
यावेळी तळेगाव येथील दैनंदिन वापरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळीनाशक टाकून टाक्यांमधील डास अळ्या नष्ट करण्यात आल्या. यावेळी विक्रमसिंग राजपूत, आरोग्य सहाय्यक सुनील बोरसे, स्वप्निल महाजन, अनंत गंगातीरे, धीरज पाटील, हेमंत पाटील, आरोग्य सेविका दुर्गा जाधव, रंजना कांबळे, गीता माळी, आशा सेविका यांनी सहकार्य केले.