साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतकडून ठराव झालेला नसताना 70/30 योजनेतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मार्च अखेर पूर्ण करून घेण्याचा प्रताप सुरू असल्याने या बांधकामाच्या प्रतापाकडे यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह बांधकाम विभाग उप अभियंता यांच्याकडून कार्यालयीन कामकाज कोणत्या पद्धतीने बघितलं जात आहे. आणि कार्यारंभ आदेश कोणत्या नियमाच्या आधारे काढला याबाबत तसेच यावल तालुक्यात पंचायत समिती स्तरापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याशी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमता बाबत यावल व रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोसगाव येथील शौचालयाचे बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे अशी कोसगाव ग्रामपंचायत उपसरपंच व काही सदस्यांनी केली असून सुद्धा सदरचे बांधकाम बंद होत नसल्याने त्या काही सदस्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोसगांव येथे ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व संबंधित ठेकेदार यांनी यावल पंचायत समिती प्रशासन व बांधकाम उप अभियंत्याशी समन्वय साधून 70/ 30 योजनेतून कोसगाव येथे शाळेजवळ आणि एका धार्मिक स्थळाजवळ सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू केले आहे, हे बांधकाम चौकशी करून करण्यात यावे असे ग्रामपंचायत उपसरपंच व काही सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती आणि आहे. सुमारे एक महिन्यापासून एक काम बंद होते, परंतु आता मार्च अखेर आर्थिक वर्ष असल्याने ठेकेदाराने हे काम पुन्हा सुरू करून पंचायत समिती बांधकाम विभाग उप अभियंता व शाखा अभियंता विश्वासात घेऊन कामाचे बिल काढण्याचा घाट रचला आहे.
शौचालयाचे बांधकामासाठी 6 लाख रुपये मंजूर असून ही रक्कम ठेकेदाराला अदा करू नये असे लेखी पत्र कोसगाव ग्रामपंचायत उपसरपंच व काही सदस्यांनी केली परंतु त्यांची लेखी तक्रार पंचायत समितीने केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसून येत आहे,
लेखी तक्रार करून सुद्धा या कामाकडे यावल पंचायत समिती बांधकाम विभागाचे 100% दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम विभाग आणि ठेकेदार मोठ्या प्रमाणात आपापल्या सोयीनुसार बांधकामे करीत असल्याने लवकरच यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा उपसरपंच व सदस्यांनी दिला आहे.