नायगाव येथील शाळेला संरक्षक भिंत उभारा

0
14

साईमत जळगाव प्रतिनिधी

नुतन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ग्रामीण भागातील शाळेकडे लक्ष द्या तसेच यावल तालुक्यातील नायगाव येथील शाळेला संरक्षक भिंत उभारा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र भोईटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळ, जळगाव संस्थेची नायगाव ता.यावल येथील सातपुडा माध्यमिक विद्यालय या शाळेत गेल्या आठवड्यात अज्ञात चोरट्यांनी पोषण आहाराची चोरी केली आहे.दरवाजे तोडफोड करणे असे मागे दोन तीन वेळेस झाले आहे.तरी वरिष्ठ संचालक मंडळातील एकही अधिकारी,संचालक यांचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे.

शाळेला संरक्षक भिंत नाही अशा आशयाचे निवेदन रावेर लोकसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्यातर्फे नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वीरेंद्र भोईटे यांना जळगाव येथे देण्यात आले.
संस्थेने येत्या महिन्यात भरात सातपुडा माध्यमिक विद्यालय,नायगाव या शाळेच्या सुरक्षेतेसाठी तातडीने संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संस्थेच्या हातेड ता.चोपडा येथील शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कूल असून शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, हातेड असे करण्यात यावे.अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत तीस दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोठ्याप्रमाण आंदोलन करण्यात येईल. असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा कल्पेश पवार, जळगाव मनसे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, सैदाणे, तुषार पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here