न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले कायदेविषयक शिबिर
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल दिन आणि संविधान दिनानिमित्त जामनेरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह जामनेर न्यायालयातून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.
शिबिराला ॲड.एस.व्ही.फाशे, श्रीमती पालवे, केंद्रप्रमुख सुरवाडे, श्री.माळी, पी.व्ही.सूर्यवंशी, दि.न.चामले, मुख्याध्यापक महाजन यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.एम.चौधरी, सचिव ॲड.एम.बी.पाटील, सरकारी वकील ॲड.कृतिका भट, ॲड.अनिल सारस्वत, श्री व सौ.चंदले, ॲड.डी.व्ही.राजपूत, न्यायालयीन कर्मचारी, शिक्षक तसेच पोलीस कर्मचारी, इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
