
घराघरात संविधान जागृतीसाठी संमेलनाचे बहुआयामी नियोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
संविधानाचे मूल्य प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून घराघरात जागृती निर्माण करण्याचे कार्य संविधान सन्मान संमेलन प्रभावीपणे पार पाडणार आहे. त्यामुळे संमेलन देशासाठी ‘आयडॉल’ ठरेल, असे मत संमेलनाचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी स्मरणिका व अतिथी नियोजनाची माहिती देत आवश्यक मार्गदर्शन केले.
बैठकीत प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाचा प्रचार वाड्या–वस्त्यांपर्यंत कसा पोहोचवायचा त्याचे नियोजन मांडले.
बैठकीत संमेलन स्थळ, शहरातील स्वागत कमानी, प्रचार व्यवस्थापन याबाबत प्रा. किसन हिरोळे, जगदीश सपकाळे, ॲड. आकाश सपकाळे, गोकुळ पोहेकर, अनिल मेढे, विवेक सैंदाणे, पितांबर अहिरे, भारती रंधे, पुष्पा साळवे, रंजीता तायडे यांनी विविध सूचना मांडल्या. भोजन समितीचे तपशील चेतन ननवरे व महेंद्र केदारे यांनी स्पष्ट केले. परिवहन समिती संदर्भात विजयकुमार मौर्य यांनी सर्वांना अवगत केले. संमेलनाच्या वेबसाइट व फेसबुक पेजची विवेक सैंदाणे यांनी उपस्थितांना माहिती दिली.
काॅस्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी संमेलनासाठी कर्मचारी संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. राज्यभरातून येणाऱ्या अतिथींच्या निवास व व्यवस्थापनाविषयी साहेबराव बागुल, पुष्पा तळेले, नीलू इंगळे, अलका शिरसाट, सुनील सोनवणे, अजय बिऱ्हाडे, ॲड.आनंद कोचुरे, भागवत पगारे, संतोष गायकवाड, राहुल भारुडे, फईम पटेल यांनी सूचना देत संमेलन यशस्वी करण्याची तयारी दर्शवली. बैठकीला विविध मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून डॉ. मिलिंद बागुल यांनी संमेलनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार तर आभार सुभाष सपकाळे यांनी मानले.


