साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी भारतीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम लोकशाही संविधानामुळेच असल्याचे सांगितले. संविधान निर्मात्यांचे उपकार म्हणून हा दिवस लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.तसेच संविधानांचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची कृतज्ञता त्यांनी मनोगतातुन व्यक्त केली.कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.अजय काटे,विभाग प्रमुख प्रा.मुकुंद अहिरे तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा.नितीन नन्नावरे यांनी संविधान दिवसाचे महत्त्व विशद केले.तर आभार प्रा.अहिरे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील यांनी केले.या कार्यक्रमात मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.