नवीदिल्ली : वृत्तसंस्था
महत्त्वाची अनेक विधेयके अर्थ विधेयके म्हणून घोषित केल्याचा दावा करून कांँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.२०१६ पासून त्यांनी तीन याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत.या याचिकांवर सुनावणी करण्याकरता न्यायमूर्ती चंद्रचूड यांंनी त्यांच्यासह सात न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली आहे.आता लवकरच या तिन्ही याचिकांवर सुनावणी होईल, अशी आशा जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.यासंदर्भात सामाजिक माध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली आहे.
“मोदी सरकारने महत्त्वाची विधेयके असंवैधानिक पद्धतीने अर्थ विधेयक म्हणून संंमत केली आहेत. त्याविरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली आहे.मी हा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर सर्वोच्च न्यायालयात ३ याचिकांद्वारे वारंवार मांडला आहे.
पहिली याचिका ६ एप्रिल २०१६ रोजी दाखल केली होती कारण या विधेयकामुळे राज्यसभेला महत्त्वाच्या कायद्यांवरील दुरुस्ती किंवा त्यावर चर्चा करण्याची किंवा विधेयके मंजूर करण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे. उदाहरणांमध्ये आधार विधेयक, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा अधिक कठोर बनवणारे विधेयकांवर राज्यसभा निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे, आशा आहे की, अंतिम निकाल लवकरच येईल. यामुळे संसदेच्या कामकाजावर दूरगामी परिणाम होईल”, असे ट्वीट जयराम रमेश यांनी केले आहे.