Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»गिरीश महाजनांच्या २० पिढ्याही काँग्रेस पक्ष फोडू शकणार नाही
    मुंबई

    गिरीश महाजनांच्या २० पिढ्याही काँग्रेस पक्ष फोडू शकणार नाही

    SaimatBy SaimatAugust 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुंबई : प्रतिनिधी

    गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात तीन राजकीय भूकंप झाले. आता भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस पक्षात मोठी फूट घडून येणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याबाबत सातत्याने चर्चा होत असते. पण महाजन यांनी उघडपणे याबाबतचे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागले आहे. त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आले, पण काँग्रेसला सध्या थांबवलं आहे, असे विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.. राज्यातील सरकारमध्ये सगळे पक्ष असल्याचं देखील महाजन म्हणाले, त्यांच्या या वक्तव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
    एकनाथ िंशदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सर्व पक्ष तर मला इथेच दिसत आहेत, जे असतील नसतील ते, कुणी सुटलेलं नाही. शिवसेना आहे, आम्ही पण आहोत, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेसपण येईल, पण काँग्रेसला सध्या थांबवलेलं आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.

    विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर काय?
    मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, गिरीश महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत, एवढे मी दाव्याने मी सांगतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन अतिशय ज्ञानी माणूस आहे. त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shocking Train Incident : नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थरकाप; आईने ८ वर्षीय मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलले

    March 19, 2026

    Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात; पोलो कार पलटून तिघांचा जागीच मृत्यू

    March 19, 2026

    Government Alert : गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क; शाळा-रुग्णालयांना १००% पुरवठा

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.