‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षपदी कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे

0
28

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे संयोजक पदाचा प्रस्ताव नाकारला आहे.
आघाडीचे अध्यक्ष आणि निमंत्रक पदाच्या निवडीसाठी इंडिया आघाडीची बैठक आज आभासी ( व्हर्च्युअल) स्वरूपात झाली. या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, ,नितीश कुमार, एमके स्टॅलिन, शरद पवार, डी राजा,ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी, सीताराम येचुरी, लालू यादव-तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, डी राजा, शरद पवार उपस्थित होते. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आणि शिवसेना ठाकरे नेते उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांची निमंत्रकपदी, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदी निवडीवर चर्चा झाली. यावेळी नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे निमंत्रक पदाचा प्रस्ताव नाकारले. तर मल्लिकार्जुन खर्गे यांची इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

अध्यक्षपद काँग्रेसकडेच
असावे : नितीशकुमार
या बैठकीत नितीशकुमार यांना इंडिया आघाडीचे संजोयक बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण, स्वत: नितीशकुमार यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर, त्यांनी लालू प्रसाद यादव यांचं नाव संयोजक पदासाठी सूचवलं. लालू यादव हे सर्वात वरिष्ठ नेते आहेत, म्हणून या आघाडीचे संजोयकपद त्यांनाच द्यायला हवे, तर, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे इंडिया आघाडीचे चेअरमनपद काँग्रेसकडेच असावे, असेही त्यांनी म्हटले. या आघाडीत मी कुठल्याही पदावर न राहता काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. दरम्यान, काँग्रेस नेते सिताराम येचुरी, सोनिया गांधींसह इतर ब्लॉकच्या नेत्यांनी नितीशकुमार यांचे नाव संयोजकपदासाठी समोर आणले होते. या बैठकीला जदयुकडून स्वत: नितीशकुमार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष ललनसिंह व संजय झा सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी, या बैठकीत बोलताना, जागावाटप हा सर्वात कठीण काम असल्याचे म्हटले.
घराणेशाही म्हणजे नेमकं काय?
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच घराणेशाहीवरून थेट सवाल देखील विचारला आहे. घराणेशाही आली, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणे योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

बहुमत मिळाल्यास आम्ही देशाला
चांगला पर्याय देऊ : शरद पवार
या बैठकीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. जागावाटपावर लवकरात लवकर निर्णय होईल, त्यावर बैठकीत चर्चा झाल्याचं पवार म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, लवकरात लवकर जागावाटप अंतिम करण्यावर चर्चा झाली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे या आघाडीचे प्रमुखपद देण्यात येणार आहे. यावर, सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झाले. त्यानुसार, आम्ही पुढील योजना आखत आहोत. या बैठकीत आघाडीचे संयोजकपद नितीशकुमार यांनी घ्यावे, असे सर्वांनीच सूचवले होते. मात्र, सध्याचे जे प्रभारी आहेत, त्यांनीच हे पद पुढे सांभाळावे, असे मत नितीशकुमार यांनी मांडल्याचे शरद पवारांनी सांगितले. यावेळी, शरद पवारांना इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ही पवारांनी स्पष्टणे उत्तर दिले. निवडणुकांच्या निकालात आम्हाला बहुमत मिळाल्यास आम्ही देशाला चांगला पर्याय देऊ शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे, सध्यातरी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा कोणीही चेहरा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here