साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, शहरात शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रविवारी ३ सप्टेंबर रोजी खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकापासून जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भोईटे नगर, रथ चौक, सोनार गल्ली, सुभाष चौक, घाणेकर चौक, टॉवर चौक, मार्गे जात कॉर्नर सभा घेऊन काँग्रेस भवन येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. प्रसंगी भाजपा सरकारची कारकीर्द व जनतेचे होणारे हाल याचे लेखा जोखा असलेली माहिती असलेलीपत्रके वाटण्यात आले
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, उपाध्यक्ष विजय वाणी, सरचिटणीस दीपक सोनवणे, सरचिटणीस सुधीर पाटील, जाकिर बागवान, विश्वास सपकाळे, ओबीसी शहराध्यक्ष सखाराम मोरे, महिला अध्यक्ष सकीना तडवी, शहर युवक अध्यक्ष मुजीब पटेल, सागर सपके, शहर सचिव योगिता शुक्ला, सुमन मराठे, राहुल भालेराव, प्राध्यापक विशाल पवार, मीडिया शहर अध्यक्ष गोकुळ चव्हाण, रवींद्र चौधरी, आण्णा जाधव आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.