काँग्रेसतर्फे जिल्ह्यात मतदार यादीच्या कामासाठी १० समन्वयकांची नियुक्ती

0
12

साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव ।

काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या निर्देशावरून आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची नावे तसेच मतदार यादीतील चुकीची नावे दुरुस्त करून पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होतील. यासाठी काँग्रेसतर्फे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय १० समन्वयकांची नियुक्ती केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ जून ते २४ जुलै २०२४ पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान मतदार यादीवर हरकती घेण्यात येणार आहे. तसेच २० ऑगस्ट २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय १० समन्वयकांची नियुक्ती केली आहे.

नियुक्त केलेल्या समन्वयकांनी विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमाची प्रसिद्धी देऊन निवडणूक आयोगाने वगळलेली नावे समाविष्ट करण्यासाठी, नावात दुरुस्ती करण्यासाठी, नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी विविध नमुने अर्ज (उदा. नमुना क्र. ६, नमुना क्र. ६ब, नमुना क्र.७, नमुना क्र. ८) निवडणूक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. समन्वयकाने काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून अर्ज भरून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून वेळेच्या आत सादर करावयाचे आहे. हा कार्यक्रम निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन प्रांताध्यक्ष आ. नानाभाऊ पाटोले यांनी केले आहे.

अशी आहेत जिल्ह्यातील १० समन्वयक

जिल्ह्यातील विधानसभानिहाय नियुक्त केलेल्या १० समन्वयकांमध्ये अमळनेरला गजेंद्र दत्तात्रय साळुंखे, चाळीसगावला देवेंद्रसिंग पाटील, एरंडोलला कलीम शेख, जळगाव ग्रामीणला मुरली सपकाळे, रावेरला धनंजय चौधरी, भुसावळला मुन्नवर खान, पाचोरा प्रदीप पाटील, जामनेरला शरद त्र्यंबक पाटील, मुक्ताईनगरला संजय मुरलीधर पाटील, चोपडाला अजबराव पाटील यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here