Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वाघुर धरण परिसरात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
    जळगाव

    वाघुर धरण परिसरात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

    SaimatBy SaimatOctober 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    माजी आमदार व मनसे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी जळगाव तालुका कंडारी येथील वाघुर धरण परिसरात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

    प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संस्था जळगाव व कृषी तंत्र विद्यालय,डिक्साई यांनी केले होते. त्यानिमित्त मत्स्य व्यवसायाबद्दल विविध माहिती देण्यात आली. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, मत्स्य व्यवसायाची संबंधित प्रधानमंत्री मत्स्यसंपदा अंतर्गत शासनाच्या योजनांची माहिती देणे, मत्स्य व्यवसायाला मिळणारा अनुदानाबद्दल माहिती देणे, मत्स्य व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी व वाघूर धरणाच्या गावालगतच्या तरुणांना मत्स्य व्यवसायातून रोजगार उपलब्ध कसा करता येईल याबद्दल माहिती देण्यात आली.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मधुकर धनगर, माजी पंचायत समिती सदस्य कैलास सुर्वे, पोलीस पाटील मल्हारराव देशमुख, माजी उपसरपंच अनिल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश सोनवणे, मिठाराम धनगर, बाळू धनगर, सुधाकर सोनवणे, राजू शेख पटेल, गोपाल रिवाज कर, शाम निकम आदिंची उपस्थिती होती.
    यावेळी कंडारी गावातील ग्रामस्थ, जामनेर व भुसावल तालुक्यातील रहिवासी तसेच डिक्साई गावातील कृषी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल बाविस्कर, आशिष सपकाळे, सिमा पाटील, रसिका बगळे, आशुतोष जाधव, साहेबराव महाजन, संजय मोती, आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण अजित बनसोडे यांनी दिले, तर सूत्रसंचलन समाधान ठाकरे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026

    Varangaon : वरणगाव रस्त्यावर मालवाहू गाडी जळून खाक

    March 23, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.