जामनेरात संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध ; पोलीस निरीक्षक यांना दिले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने निवेदन

0
35
जामनेरात संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध ; पोलीस निरीक्षक यांना दिले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने निवेदन -saimatlive.com

साईमत जामनेर प्रतिनिधी

जामनेर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ चौकात बेताल वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. येथून पुढे जात आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान च्या नावाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तरुण मुलांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली देशाचा चुकीचा इतिहास सांगत असून तरुणाईचे माथे फिरविणारे जातीय वादी भडकाऊ वक्तव्य करीत आहेत.

नुकतेच अमरावती येथे बोलतांना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अक्षेपार्य वक्तव्य करुन गांधीजींचे वडील मुस्लीम असल्याचे बोलले आहे. तसेच या अगोदर सुद्धा त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो भारतीय चलनात असलेल्या नोटा मधून काढून टाकण्यात यावा असे वक्तव्य केले होते. असे चुकीचे वक्तव्य नेहमीचं भिडे महाशय करीत असतात. यामुळे समाजा समाजा मध्ये जातीय तेढ निर्माण होऊन महाराष्ट्रातील वातावरण गढूळ होऊ शकते. त्यामूळे भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर ई. पी. कोड १५३ खाली गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या वतीने पोलीस नाईक मुकूद पाटील यांनी स्वीकारले. निवेदनावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, मुलचंद नाईक, चतरसिंग राठोड, सोणुसिंग राठोड, राजेश चोपडे, हरीश पाटील, मगन जाधव, फक्रोद्दिन शेख, गणेश झालटे, जगदीश राठोड, ईश्वर रोकडे, अ. रफीक मौलाना , गोरख नरवाडे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here