सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता  

0
9

सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता  

जळगाव

शहरातील सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात कै.रविंद्र बाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त इस्कॉनच्या सहयोगाने पाटील परिवारातर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्साहात पार पडला. श्रीमद भागवत कथा प्रवक्ता श्रीमान उद्धव प्रभुजी (भागवत शास्त्री, वृंदावन) होते.

कथेचे आयोजन दि.११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनन जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, इस्कॉन जळगावचे अध्यक्ष पार्थसारथी प्रभुजी, श्रीमान चैतन्य जीवन प्रभुजी, आदित्य वामनदास, उत्तम मोहन दास, डॉ.माधव दास व समस्त पिंप्राळा हरे कृष्ण भक्त उपस्थित होते.

शेवटी मधुर कीर्तनाने कथेची सांगता झाली. कथा कै.रविंद्र पाटील यांच्या पत्नी सिंधुताई रविंद्र पाटील यांनी आयोजित केली होती.  कार्यक्रम यशस्वितेसाठी सहयोग कॉलनी मित्र, समस्त हरे कृष्ण मंदीर भक्तवृंद आणि परिसरातील महिला व पुरुषांनी परिश्रम घेतले. भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here