साईमत/ न्यूज नेटवर्क । अमळनेर।
येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांनी शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी, यासाठी मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचे आयोजन केले होते. तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रथयात्रेचा नुकताच समारोप करण्यात आला.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून १६ मे रोजी जळगाव जैन हिल्स येथून मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचा प्रारंभ झाला होता. तालुक्यातील १५२ गावांमध्ये रथयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
रथयात्रेचा नुकताच मंगळग्रह मंदिर परिसरात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक अमोल कोठावदे, योगेश खैरनार, योगेश वंजारी, दीपक चौधरी, सुभाष पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांच्यासह मंगळ सेवेकरी उपस्थित होते.