साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील श्रीराम, व्यास मंदिरात अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा (त्रिपुरारी) भल्या पहाटे काकड आरतीचा नुकताच समारोप करण्यात आला. काकड आरतीत गणेश, श्रीराम, शिवशंकर देवांची भूपाळी होऊन पांडुरंग, श्रीरामाची आरती भाविक सुरेल आवाजात म्हणत होते. यावेळी भक्तगण उपस्थित राहुन भजनाचा आनंद घेत होते.
यावेळी पुरूष भाविकांमध्ये काशीनाथ बारी, रमेश बोंडे, पंडीत अप्पा, राजू टेलर, श्रीरंग वाघ, अशोक बारी, रवींद्र तळेले, पांडुरंग लाड, सुनील माळी, अशोक चव्हाण, राजू पाचपांडे, रवींद्र शिर्के, हिरामण कुंभार, मनोज येवले, अजय गडे, पितांबर सोनवणे आदी उपस्थित होते. महिला भाविकांमध्ये विद्या महाजन, निशा प्रजापती, सुरेखा बारी, ज्योती पाचपांडे, सुनिता वानखेडे, उषाबाई चौधरी, सुभद्रा मांडोले, चंद्रभागाबाई, आशा वारूळे, अनुसया बारी आदी उपस्थित होत्या.
एक महिन्यापासून भाविक काकड आरतीला हजर राहून आनंद घेत होते. नंतर दररोज भाविकांना काकड आरतीनंतर चहापान देण्यात येत होते. दुपारी १२ वाजता नैवेद्य दाखविण्यात येऊन काकड आरती म्हणत व्यासांचा जयजयकार केला. यानिमित्त संपूर्ण परिसर सुशोभित केला होता. यशस्वीतेसाठी पुजारी बिल्लू महाराज, रमेश बोंडे, गुरव अप्पा, अशोक पाटील, पवन पाटील, अजय गडे, अरूण फालक आदींनी परिश्रम घेतले. तसेच शहरातील इतर नागरिकांनी कार्यक्रम सहकार्य केले. रमेश बोंडे यांनी सर्वांचेच स्वागत, आभार व्यक्त करून काकड आरतीचा समारोप केला.